top of page

स्वप्ने पाहायला शिका

Writer's picture: AimSolute SolutionistAimSolute Solutionist

स्वप्ने पहा


स्वप्ने पाहायला शिका


धीरूभाई अंबानी सांगतात : मोठे स्वप्न पहा कारण मोठ्या स्वप्न पाहणाऱ्यांचीच स्वप्ने खरी ठरतात .


धीरूभाई शिक्षणात सर्वसामान्य विद्यार्थी होते. त्यांचे इंग्रजीचे ज्ञान चांगले तर गणित कच्चे होते. इ.स. १९४९ साली आपले १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून धीरूभाई नोकरीच्या शोधात एडन येथे गेले. तेथे बर्मा शेल कंपनीची उपकंपनी म्हणून काम करणार्‍या ए. बेस नावाच्या कंपनीत धीरूभाई मासिक ३०० रुपये पगारावर पेट्रोल पंपावर नोकरी करू लागले. ही कंपनी लहान मोठ्या अनेक उद्योगांमध्ये कार्यरत होती. आंतरराष्ट्रीय कंपनीचा भाग असल्याने तेथे अनेक देशांचे व्यापारी येत असत. तेथेच धीरूभाई यांनी स्वतःची रिफायनरी स्थापन करावी असे स्वप्न पाहण्यास सुरूवात केली.



'गुंतवणूक करायची, तर स्वत:च्या व्यक्तिमत्त्वावर करा.' - वॉरन बफेट


धीरूभाई अंबानी पेट्रोलपंपवर काम करत होते, अमिताभ बच्चन पडद्यावरील छोटा कलाकार होता, रजनीकांत बस कंडक्टर होता, मनमोहन सिंग ओबेरॉय हॉटेलमध्ये काम करत होते, नारायण मूर्ती लॅब असिस्टंट होते, शाहरूख खान टीव्ही सीरिअलमध्ये काम करत होता, महेंद्रसिंग धोनी हा रेल्वेमध्ये टी.सी. होता, जॉनी लिव्हर धारावीच्या झोपडपट्टीत राहत होता. जर या सामान्य व्यक्ती यशस्वी उद्योजक होऊ शकल्या, तर तुम्हीही तुमच्या जीवनात यशस्वी उद्योजक होऊ शकता. मोठी स्वप्ने पाहा, ध्येय लिहून ठेवा आणि विजेता व्हा.


जे मोठी स्वप्ने पाहू शकतात , तेच ती स्वप्ने पूर्ण करू शकतात आणि तेच यशस्वी उद्योजक होतात.

Comments


bottom of page